ताज्या बातम्या

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

आता एक सर्वाच्च न्यायालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल शुक्रवारी बंद म्हणजेच हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे.

Published by : Dhanshree Shintre

आता एक सर्वाच्च न्यायालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल शुक्रवारी बंद म्हणजेच हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरात व्हिडिओ दाखवली जात होती. XRP क्रिप्टोकरन्सी यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केली आहे.

सर्वोच्च न्यायालय घटनात्मक खंडपीठांसमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांची सुनावणी थेट प्रवाहित करण्यासाठी युट्यूब चॅनेल वापरते. अलीकडेच कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीम करण्यात आली होती हॅकर्सने हा व्हिडीओ प्रायव्हेट बनवून टाकला आहे. या व्हिडीओच्या ऐवजी या चॅनलवर क्रिप्टो करेंन्सी-एक्सआरपीच्या जाहिरातीचा व्हिडीओ दिसतोय.

याबाबत सुप्रीम कोर्टाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नेमके काय झाले याबद्दल आम्हाला खात्री नाही. मात्र संकेतस्थळाशी छेडछाड झाल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर आज सकाळी ही समस्या उघडकीस आली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने ती सोडवण्यासाठी एनआयसीची मदत मागितली आहे.

सध्या हॅकिंगचे क्राईम प्रचंड सुरु आहेत, त्यामुळे आजकाल, हॅकर्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय YouTube चॅनेल लक्ष्य करत आहेत. रिपलने स्वतःचे सीईओ ब्रॅड गार्लिंगहाऊसचे बनावट खाते तयार करण्यापासून हॅकर्सना रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल YouTube वर आता दावा केला जात आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी