ताज्या बातम्या

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर लावलेले आरोप खोटे ; ससूनच्या मेडिकल रिपोर्टमधून माहिती समोर

Published by : Dhanshree Shintre

पुण्यात लक्ष्मण हाके-मराठा तरुणांमध्ये वाद झाला. लक्ष्मण हाकेंनी दारू पिल्याचा मराठा तरुणांचा आरोप होता. दारू पिऊन लक्ष्मण हाकेंनी वाद घातल्याचा दावा करण्यात आला होता. रात्री उशिरा लक्ष्मण हाकेंची ससूनमध्ये वैद्यकीय तपासणी केली. मराठा आंदोलकही मोठ्या प्रमाणात ससूनमध्ये पोहोचले होते.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना रात्री उशिरा पोलिसांनी ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यासाठी आणलं. या ठिकाणी हाके यांच्याबरोबर मराठा आंदोलन आणि हाके यांचे नातेवाईक देखील वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित होते. पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. त्याचबरोबर मराठा आंदोलन देखील ससुन रुग्णालयात दाखल झाले होते.

हा प्राथमिक अहवाल आहे आणि प्राथमिक अहवाल यामधून काढण्यात आला की लक्ष्मण हाके यांनी मध्य प्राशन केली नसल्याची माहिती समोर आली आहे. आणखी एक सँपल लक्ष्मण हाके यांचं घेतलेलं आहे आणि ते सँपल आता प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर साधारण उद्यापर्यंत रिपोर्ट येणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये स्पष्ट होणार आहे की खरचं लक्ष्मण हाके यांनी मध्यप्राशन केलं होतं का नाही. पण प्राथमिक अहवाल जो डॉक्टरांनी दिलेला आहे त्यानुसार लक्ष्मण हाके यांना या संपूर्ण प्रकाराबद्दल क्लिन चीट मिळालेली आहे.

Navratri 2024: नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पठण का केले जाते? जाणून घ्या...

Navratri 2024: नवरात्रोत्सवनिमित्त 'सती' या देवीची जाणून घ्या महत्त्वपूर्ण कथा

Paithan: पैठण येथे श्रीराम कथेची सांगता; भुमरे परिवाराच्या उपस्थितीत राम कथेची सांगता

Navratri 2024: यंदा नवरात्री 9 दिवस नाही तर 10 दिवस होणार साजरी; जाणून घ्या कधी आहे घटस्थापना?

October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये स्वतःची काळजी कशी घ्याल? जाणून घ्या...