कर्नाटकच्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यावर आपला दावा सांगितल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सीमावाद चिघळलेला असतानाच कन्नड संघटनांनी 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली होती. हिरेबागवाडी टोलनाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता नवा सीमावाद निर्माण झाला आहे. आता ठाणे जिल्ह्यातही नवा सीमावाद निर्माण झाला आहे. दिवा परिसर गेली अनेक वर्ष ठाणे महापालिका क्षेत्रात आहे. मात्र, अनेक मूलभूत सुविधांपासून आम्ही वंचित आहोत, असा दावा जागा हो दिवेकर या संस्थेने केला आहे. तसेच ठाणे महापालिका हद्दीतून दिवा परिसराला वगळण्याची मागणी केली आहे.
आम्हाला ठाणे महापालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा दिल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हाला ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतून वगळण्यात यावे, आमचा ठाण्याऐवजी नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्यात यावा. अशी दिवेकरांनी मागणी केली आहे. दिवा परिसर नवी मुंबईला जोडण्यात यावा, महापालिकेने काही स्थानिकांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांचा विश्वास संपादन केला. मात्र आम्ही ठेवलेला विश्वास म्हणजे आमचा विश्वासघातच ठरला. ठाणे महापालिकेने आम्हाला कोणत्याही मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत, अशी मागणी जागा हो दिवेकर या संस्थेचे अध्यक्ष विजय भोईर यांनी केली आहे. भोईर यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे