महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरातून धक्कादायक बातम्या समोर आल्या आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांच्या शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत . त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बाल्लेकिल्यात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे का? काय असा प्रश्न उदभवू लागला आहे.
आज सकाळी घंटाळी देवी रोडवर झालेल्या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असताना वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसरी गोळीबाराची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळी सणांच्यादिवशीच गोळीबाराच्या घटना घडल्याने ठाण्यातील पोलिसांचा कार्य क्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
ठाण्यातील लोकमान्य नगर पाडा नं 4 मध्ये गोळीबाराची घटना घडली. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या असे जखमींचे नाव आहे. जखमी असलेला गणेश जाधव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यापूर्वी पहाटेठाण्यातील घंटाळी मंदिर रोड परिसरात गोळीबाराची घटना घडली. पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यावेळी तीन राऊंड्स फायरिंग करण्यात आली. त्यातील एक गोळी एकाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंतु नागरिक या घटनेमुळे भयभीत झाले असून पोलिसांचा गुन्हेगारावर वाचक आहे की नाही असा प्रश्न विचारात आहे.