रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध व्यक्त केला जाणार असून पोलिसांनी या प्रकरणी रोशनी शिंदे यांच्याविरोधातच काल गुन्हा दाखल झाल्यामुळे आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात आज पोलीस आयुक्तालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच महामोर्चाला अखेर ठाणे पोलिसांची परवानगी मिळाली आहे. मात्र पोलिसांच्या अटी पाळाव्या लागणार आहेत. त्या म्हणजे कार्यक्रमाच्या दरम्यान कोणतेही आक्षेपार्य देखावे फलक, चित्रे, चिन्हे व आकृत्या प्रदर्शीत करू नये.कार्यक्रमाच्या दरम्यान कोणताही प्रकारे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न येऊ नये.
तसेच शांततेस बाधा पोहचेल अश्याप्रकारच्या घटना घडणार नाही याची दक्षता घ्यावी.कार्यक्रम शांततेने, शिस्तीने व कोणत्याही प्रकारे गोंधळ न करता पार पाडण्यात यावा. कार्यक्रम दिलेल्या वेळी तारखेस व ठिकाणी सुरू करून मुदतीत संपविण्यात यावा. कोणत्याही व्यक्तीच्या जातीच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य, भाष्य, घोषणा, हालचाली करु नयेत. असे पोलिसांनी सांगितले आहे.