अमोल धर्माधिकारी : पुणे | राज्यातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपेला (Tukaram Supe) कोर्टाकडून आज (31 मे) जामीन मंजूर करण्यात आला आहे. सुपे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष होते.
2019-20 साली झालेल्या टीईटी परीक्षेमधील गैरव्यवहाराचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. या परिक्षेच्या निकालातील अंतिम 16 हजार 705 पात्र परीक्षार्थ्यांचे कंपनीकडील डाटासंबंधी तांत्रिक विश्लेषण आणि आरोपींकडून मिळालेला डिजिटल पुराव्याचा एकत्रित तपास सुरू आहे.
तसेच परीक्षार्थींचे ओएमआर शिटस याचा तपास करून एकूण सात हजार 880 अपात्र परीक्षार्थींना पात्र करण्यासाठी त्यांच्या मूळ गुणांमध्ये वाढ करून त्यांना पात्र केल्याचे निष्पन्न झालेले आहे.
तसेच टीईटी परीक्षा घोटाळाप्रकरणी पुणे पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केलं होतं. आरोपी सुकाराम सुपे (Tukaram Supe), सुखदेव ढेरेसह १५ जणांविरोधात ३,९९५ पानांचं हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं. या प्रकरणातील प्रितेश देशमुखसाही याआधी जामीन मंजूर झाला होता.