थोडक्यात जाणून घ्या
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी
पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
चिनाब नदीवरील पूल दहशतवाद्यांच्या रडारवर?
गुप्तचर विभागाची माहिती
जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल असलेल्या चिनाब ब्रिजबाबत गुप्तचर विभागाकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान चीनसोबत मिळून जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे. जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेने महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेत जगातील सर्वात मोठा रेल्वे पूल उभारला होता.
हा पूल चिनाब नदीवर असल्याने त्याला चिनाब ब्रिज असं नाव देण्यात आलं होतं. या ब्रिजमुळे रियासी जिल्ह्यातील स्थानिकांच्या दळणवळणाची मोठी सोय झाली. मात्र पाकिस्तान चीनसोबत जम्मू काश्मीरमध्ये सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती गोळा करत आहेत, अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली आहे.
दरम्यान, चिनाब ब्रिज हा सुरक्षित आणि दळणवळणाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा आहे. तसेच या ब्रिजमुळे भारताच्या प्रत्येक राज्यासोबत कश्मिर जोडला जात आहे. जगातील सर्वात उंच आणि विशाल ब्रिज म्हणून ओळखला जाणारा चिनाब ब्रिजवरुन आठ डब्यांच्या मेमू ट्रेनची चाचणी घेण्यात येणार आहे.