जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लागगोपाठ दुसरा हल्ला केला. दहशतवाद्यांनी राजौरीतील डांगरी गावात रविवारी सायंकाळी तीन घरांवर गोळीबार केला होता. त्यात चार नागरिकांचा मृत्यू, तर सहाजण जखमी झाले होते.सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी स्फोट घडवला. त्यात सान्वी शर्मा (७) आणि विहानकुमार शर्मा (४) या बहिण-भावाचा त्यात मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले. अवघ्या १४ तासांतच झालेल्या दोन हल्ले दहशतवाद्यांनी केले.
जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की, या दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असलेल्यांना शोधून कठोर शिक्षा करण्यात येईल,हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये आणि वारसास सरकारी नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.
जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग यांनी जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार यांच्यासह घटनास्थळी भेट दिली. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. पोलीस मोठय़ा प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत, असे सिंग म्हणाले.