थोडक्यात
पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश, संशयितांवर सीसीटीव्हीची करडी नजर
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज
अमोल धर्माधिकारी, पुणे
विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. उद्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात दहा हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश, संशयितांवर सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज असून बंदोबस्तात शहर पोलिस दलातील अधिकारी-कर्मचारी, केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ), राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), शीघ्र कृती दल (क्यूआरटी) आणि होमगार्ड यांचा समावेश असणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: