Raj Thackeray Team Lokshahi
ताज्या बातम्या

मनसेला मराठीचा विसर? 12 तारखेच्या सभेचा टीझर हिंदी भाषेत!

Published by : Vikrant Shinde

गुढीपाडव्यादिवशी झालेल्या मनसेच्या मेळाव्यानंतर (MNS Gudhi Padwa Melawa) राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी भाषणातून मांडलेल्या आक्रमक हिंदुत्त्वाच्या भुमिकेचा विरोधकांकडून विरोध तर करण्यात आलाच शिवाय मनसेमधील अनेक नेते व कार्यकर्तेदेखील दुखावले गेले. त्यानंतर काहीच दिवसांत 9 एप्रिलला ठाणे येथे राज ठाकरेंची आणखी एक सभा होणार असल्याची घोषणा करण्यात आली. मात्र काही कारणांमुळे 9 तारखेची सभा 12 तारखेला होणार आहे.

टीझर प्रदर्शित:

दरम्यान, 12 तारखेला ठाण्यामध्ये होणाऱ्या सभेचा टीझर (MNS Sabha Teaser) सोशल मीडियीवर मनसे नेते संदीप देशपांडेंद्वारे प्रदर्शित करण्यात आलाय. महत्त्वाची बाब म्हणजे हा टीझर हिंदी भाषेमध्ये प्रदर्शित झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे. मनसेला आता मराठीचा विसर पडला का? असा प्रश्न विचारला जातोय.

टीझरमध्ये नेमकं काय?

ह्या टीजरमध्ये अजित पवार (Ajit Pawar), शरद पवार (Sharad Pawar) व संजय राऊत (Sanjay Raut) ह्यांनी गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरेंवर केलेल्या टीकेचे व्हिडीओज व त्यानंतर 'करारा जवाब मिलेगा' असा व्हॉईसओव्हर आहे. त्यामुळे, आता 12 एप्रिलच्या सभेत नक्की काय होणार ह्याची उत्सूकता सर्वांनाच लागली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result