चीनने सोमवारी अल्पवयीन मुलांना टॅटू काढण्यास बंदी घातली. चीनचं म्हणणं आहे की 18 वर्षांखालील लोकांसाठी टॅटुसारख्या गोष्टी म्हणजे समाजवादी मूलभूत मूल्यांच्या विरुद्ध आहे. चीनने विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला आणि शाळांना या प्रथेला परावृत्त करण्याचं आवाहन केलं आहे. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, कोणताही टॅटू कलाकार किंवा अल्पवयीन मुलांना टॅटू बनवून देणाऱ्या दुकानावर सुद्धा कायद्यानुसार शिक्षा केली जाईल. ज्या मुलांच्या शरिरावर आधीच टॅटू आहेत, आणि ते काढू इच्छित असतील, तर त्यांना त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन केलं जाईल, असं निवेदनात म्हटलं आहे.
टॅटूवरील बंदी हा चीनच्या कम्युनिस्ट पार्टी (CPC) युथ लीग आणि राज्य प्रशासनासह अनेक सरकारी विभागांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. चीनच्या मंत्रिमंडळाने जारी केलेल्या अल्पवयीन मुलांच्या वैयक्तिक उपाययोजनांचा एक भाग आहे. या संदर्भात, मंत्रालयानं विविध मंत्रालयं आणि विभागांशी सल्लामसलत केली असून, प्रसिद्धी विभाग, सर्वोच्च लोक न्यायालय, सार्वजनिक सुरक्षा मंत्रालय, अंतर्गत सुरक्षा आणि आरोग्य मंत्रालयाचा यामध्ये समावेश आहे.
अल्पवयीन मुलांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार राज्य, समाज, शाळा आणि कुटुंबांनी अल्पवयीन मुलांना शिक्षित केलं पाहिजे. त्यांना टॅटूमुळे होणारी हानी पूर्णपणे कमी करून समाजवादी मूल्य रुजवण्यासाठी आणि आचरणात आणण्यास मदत केली पाहिजे.