अनिल ठाकरे, चंद्रपूर
पावसाळ्यामुळे तीन महिने बंद राहिल्यानंतर जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्प आज एक ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होत आहे. ताडोबा प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात पावसाळ्यात पर्यटन पूर्णपणे बंद ठेवले जाते. मात्र पर्यटकांचा हिरमोड टाळण्यासाठी बफर क्षेत्रात सफारी सुरू होती. आज पासून सफारीला प्रारंभ होत असल्याने हॉटेल, रिसॉर्ट, जिप्सीचालक सज्ज झाले.
मोहर्ली, पांगडी, कोलारा, झरी आणि खुटवंडा या प्रवेशद्वारातून सकाळी साह वाजता एकाचवेळी सफारीला प्रारंभ झाले, यासाठी ऑनलाइन बुकिंग सुरू झाल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी ताडोबा हाऊसफुल झाले आहे. उदंड पावसाने कंटाळलेल्या हौशी पर्यटकांना आता व्याघ्र दर्शनाचा आनंद लुटता येणार .यावेळी ताडोबा चे क्षेत्र संचालक डॉ. जितेन्द्र रामगावकर,अयार गोंड आणि पर्यावरण प्रेमींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.