ताज्या बातम्या

देवेंद्रभाऊ अजून किती खाली उतरायचं ठरवलं आहे आपण..? अंधारेंची मिश्किल शब्दात टीका, कारण काय?

Published by : shweta walge

अकोल्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या ८ व्या वर्गातली मुलगी आणि १० व्या वर्गातल्या मुलाच्या शालेय शिक्षणावर किती खर्च झाला याची चौकशी अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केली जातेय. इतक्या सहजा सहजी उपलब्ध होणाऱ्या या माहितीसाठी अँटी करप्शन ब्युरोने अकोल्यातल्या प्रभात किड्स या शाळेला चक्क पत्र पाठवलंय. यात नितीन देशमुख यांच्या मुलांवर शाळेत किती खर्च झाला याचा तपशील शाळेच्या मुख्याध्यापक आणि संचालकांकडून मागवला आहे. यावरुन शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मिश्किल शब्दात टीका करत ट्विट केलं आहे.

सुषमा अंधारे यांच ट्विट

देवेंद्रभाऊ अजून किती खाली उतरायचं ठरवलं आहे आपण..? खोतकर, वायकर या लोकांना आपण असंच अगतिक केलं होतं.!! आधी @rautsanjay61 यांच्या मुलीच्या लग्नातल्या मेहंदीवालीचा खर्च, आता नितीनबापू तुमचं सावज व्हायला तयार नाहीत म्हणुन चक्क त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च..? इतका नीचपणा !

दरम्यान, काही दिवसांपुर्वी नितीन देशमुख गाडीमध्ये किती डिझेल-पेट्रोल भरतात याचीही विचारपुस पेट्रोलपंप चालकांकडे काही अधिकाऱ्यांनी केली होती.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?