कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या 2023च्या सर्व 224 जागांचे कल हाती आले आहेत. सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला आहे. तर, भाजपा आणि जनता दलाला अपेक्षित अशी आघाडी मिळत नसल्याचं आकडेवारीवरून कळत आहे. या निकालावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी 'पप्पू पास नही हो गया, पप्पू मेरिट मे आ गया' असं म्हणत भाजवर चांगलीचं टीका केली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या, ,महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. हा सगळ्यांसाठी एक संदेश आहे की मोदी है तो मुमकिन है असं काहीही नसतं. मोदींनाही हरवता येऊ शकतं 'पप्पू पास नही हो गया पप्पू मेरिट मे आ गया'. पंतप्रधान मोदी यांनी प्रचंड नकारात्मक राजकारण ऊर्जा केली होती त्याला सगळे कंटाळले आहेत. कर्नाटक मधील निकालाची विजयाची ऊर्जा हे महाराष्ट्रात दिसेल.
पुढे म्हणाल्या की, ज्या राहुल गांधींना भाजपच्या स्लीपर सेल ने पप्पू म्हणून हिणवलं होतं ते राहुल गांधी हे सर्वांचे बाप निघाले. राहुल गांधी यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न आणि राहुल गांधीच काय तर नेहरू, गांधी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. कधी धर्माच्या लोकांचा तर कधी महापुरुषाच्या लढायचं हे भाजपची भूमिका आहे, मात्र हा डाव सर्व लोकांना कळला आहे. असं सुषमा अंधारे म्हणाल्या.