कार अपघात प्रकरणी आता सुषमा अंधारे व्यक्त झाल्या सुषमा अंधारे बावनकुळेंना प्रश्न करत म्हणाल्या की, मी डिसीपी साहेब आणि पीआय साहेब या दोघांना ही पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भात काही प्रश्न विचारले होते आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे. जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला कळालं आहे की गाडी कोणाची आहे आणि गाडीत माणूस कोण होता, तर तुम्ही सेक्शन वाढवतं का नाही? तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही? तर त्यावर ते मौन आहेत.
सहाजीक आहे कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळेंची ताकद थोडी भारी पडत असेल. त्यामुळे संकेतचं नाव एफआयआरमध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते घाबरत असतील. सकाळी विमानतळावर काही पत्रकारांकडून मला प्रश्न विचारले गेले आणि ते म्हणाले की, जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे. त्यावर मी त्यांना विचारल तुम्हाला कोणी सांगितलं तर ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड यावर सुषमा अंधारे म्हणाल्या जितेंद्र सोनकांबळेवर दबाव टाकला जात आहे. जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गावर येतात. मला त्यांच्या जीवाची काळजी आहे.
त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे, त्यांच्या जिवाला संरक्षण मिळालं पाहिजे. जर बावनकुळे म्हणत असतील की तपास निर्पेक्ष व्हावा तर मी पुन्हा एकदा बावनकुळेंना हे स्पष्ट करते की, खरचं तपास निर्पेक्ष व्हावा असं वाटत असेल आणि तुम्ही खरचं कायद्याचे धनी असाल तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खरचं तुम्हाला कायद्याची जाण असेल तर तुम्ही डिसीपी यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचं नाव आरोपी म्हणून वाढीव करा अजून सेक्शन वाढवा हे तुम्ही सांगाव लागेल जर तुम्ही खरचं निरपेक्ष बोलणारे असाल तर.