रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरोधात झालेल्या आयपीएलच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या सुर्यकुमार यादवने धावांचा पाऊस पाडला. धडाकेबाज फलंदाजी करून भल्या भल्या गोलंदाजांचा सुर्यकुमारने धुव्वा उडवला. सुर्याने या सामन्यात अवघ्या १७ चेंडूत अर्धशतक ठोकलं. सुर्याने ५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीनं १९ चेंडून ५२ धावांची तुफानी खेळी केली. या धावांच्या जोरावर सूर्यकुमारने ७००० धावाही पूर्ण केल्या. त्याामुळे भारतासाठी टी-२० मध्ये ७ हजारांहून अधिक धावा करण्याच्या शर्यतीत सूर्यकुमार नववा फलंदाज ठरला आहे. याशिवाय मिस्टर ३६० ने रोहित शर्मा आणि सुरेश रैनाचा विक्रमही मोडला आहे.
सूर्यकुमार यादव टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात वेगवान ७ हजार धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करून सूर्याने रोहित शर्मा आणि सुरेश रैनाला मागे टाकलं आहे. सूर्याने २४९ व्या इनिंगमध्ये त्याच्या ७ हजार धावा पूर्ण केल्या. रोहितने २५८ इनिंगमध्ये ७ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. याशिवाय सुरेश रैना २५१ इनिंगमध्ये ७ हजार धावा करण्यात यशस्वी झाला होता. भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात वेगवान ७ हजार धावा करण्याचा विक्रम के एल राहुलच्या नावावर आहे. राहुलने १९७ इनिंगमध्ये हा कारनामा त्याच्या टी-२० करिअरमध्ये केला होता. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने २१२ इनिंगमध्ये ७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ७ हजार धावा पूर्ण करण्याच विक्रम बाबर आझमच्या नावावर आहे. बाबरने टी-२० क्रिकेटमध्ये १८७ इनिंगमध्ये ७००० धावा पूर्ण केल्या आहेत. ख्रिस गेल दुसऱ्या स्थानावर आहे. गेने १९२ इनिंगमध्ये ७ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानावर के एल राहुल आहे.
आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणारे फलंदाज
१२३१३ - विराट कोहली
११३१२ - रोहित शर्मा
९७८३ - शिखर धवन
८६५४ - सुरेश रैना
७३०९ - एम एस धोनी
७२७२ - रॉबिन उथप्पा
७२२४ - दिनेश कार्तिक
७१९२ - के एल राहुल
७०२१ - सूर्यकुमार यादव