सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागांमध्ये काही ठिकाणी यंदा चांगले पीक आहे. पीकांना आता खतपाणी देण्याची वेळ आहे. परंतु दुकानदार शेतकऱ्यांना युरीया देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
युरीयासोबत इतर उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांनाच खते मिळत आहेत. ही शेतकऱ्यांची अडवणूक आहे. जिल्हाधिकारी, पुणे यांनी या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या दुकानदारांना समज द्यावी.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की. प्रसंगी कठोर कारवाई करायलाही मागेपुढे पाहू नये. शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना कठोर शासन व्हायला हवे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.