Supriya sule  
ताज्या बातम्या

अमित शहांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाल्या, "हिशोब व्यवहार नाही, तर...."

Published by : Team Lokshahi

शरद पवारांनी ५० वर्षांचा हिशोब देण्याऐवजी ५ वर्षांचाच द्यावा, अशी टीका अमित शहांनी पवारांवर केली होती, या प्रश्नाचं उत्तर देताना सुळे म्हणाल्या, हिशोब हा व्यवहार नाहीय, ती समाजसेवा आहे. आम्ही राजकारणात हिशोब करण्यासाठी नाही आलो, आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो आहोत. महाराष्ट्राच्या जनतेनं ५५ वर्ष शरद पवार यांना आशीर्वाद दिलाय. ५५ वर्ष जनता खंबीरपणे पवार साहेबांच्या पाठीशी उभी राहिली आहे. ते जनतेतून निवडून गेले आहेत. हेच जनतेचं प्रेम आहे.

माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारतातल्या सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देते. जगात जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. याचा आनंद असतोच. पण मला नेहमी असं वाटतं की, जागतिक महिला दिन साजरा झाला पाहिजे. पण ३६५ दिवस माणुसकीचा दिवस साजरा केला, तर महिला आणि पुरुष यांच्या समतेबद्दल आपण सर्वच लढत असतो. त्याला आणखी एक खूप मोठी दिशा आणि ताकद पाहिजे. मी अमित शहा यांचे मनापासून आभार मानते, कारण त्यांनी जो आरोप केला तो परिवारवादावर होता. त्यांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप आमच्यावर केला नाही.

अमित शहा जेव्हा महाराष्ट्रात यायचे, तेव्हा ते नॅचरली करप्ट पार्टी (एनसीपी) असं ते म्हणायचे. पण आता त्यांनी भ्रष्टाचाराचा एक शब्दही काढला नाही. मी परिवारवाद आहे ना. वकीलाचा मुलगा वकील होऊ शकतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होऊ शकतो, मग आम्ही लोकांमध्ये जाऊन मतं मागू शकत नाही का, भारतीय जनता पक्षातही अनेक परिवारवाद आहेत. जेव्हा एक बोट तुम्ही आमच्याकडे दाखवलं तर तीन बोटे तुमच्याकडे येतात, असं अमित शहा म्हणाले होते. आता त्यांना मी याची आठवण करुन देते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा