Supriya Sule Team Lokshahi
ताज्या बातम्या

...तर हात तोडुन हातात देईन; महिला कार्यकर्तीला झालेल्या मारहाणीनंतर सुप्रिया सुळे संतापल्या

Published by : Sudhir Kakde

जळगाव | मंगेश जोशी : महाराष्ट्रात यापुढे कुठल्याही पुरुषाने कुठल्याही पक्षातील महिलेवर हात उगारला तर स्वतः तिथे जाऊन हात तोडुन हातात देईन अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दिली आहे. पुण्यातील स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे भडकल्या आहेत. भाजप पक्षातील एक कार्यकर्ता महिलेवर हात उचलतो त्या पक्षाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. भाजपने महिलेवर हात उचलणाऱ्या कार्यकर्त्यास पक्षातून बाहेर काढलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर बोलताना सांगितलं की, असं कृत्य महाराष्ट्रात कधीही झालं नाही. मात्र महाराष्ट्रात असं कृत्य भाजपने केलं आहे. भाजपकडून महिलांवर अन्याय होत राहिल्यास आम्ही आमच्या भाषेत त्यांना शिकवू. महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, काल महिलेच्या अंगावर एकदा हात उगारला, पुन्हा उगारू नका, कारण आता अती झालं आहे. अन्यथा या लोकांचे घरातून बाहेर पडण्याचे वांदे होतील असा इशारा सुप्रिया सुळेंनी दिला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, बेटी बचाव बेटी पढाव ही संस्कृती सांगणाऱ्यांची ही संस्कृती आहे का? माझ्या महिला कार्यकर्त्याने चुक केली असती तर मी स्वतः स्मृती इराणी यांची माफी मागितली असती. त्यांना माफी मागण्यामध्ये काही कमीपणा नव्हता. जे चूक आहे ते चूक आहे, मात्र एखादी घोषणा दिल्याने हात उगारला जातो हाच यांचा पुरुषार्थ आहे का? असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला.

वायू प्रदूषण आणि उष्णतेमुळे ब्रेन स्ट्रोकची प्रकरणे वाढली; जगात अशा लोकांची संख्या पोहोचली 1.19 कोटींवर

Maharashtra Rain: 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

IND vs BAN: मोठ्या लक्ष्यासमोर बांगलादेशची दमदार सुरुवात; भारत विजयापासून सहा विकेट्सनी लांब

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर