काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना जातवैधतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. रश्मी बर्वे यांना क्लिन चिट देणारा नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. रश्मी बर्वे यांचे जातवैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने जातवैधता समितीवर ताशेरे ओढले होते.
जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयामुळे रश्मी बर्वे यांना लोकसभा निवडणूक लढवता आली नाही. मात्र आता काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा देत जातवैधता प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे.