इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS)वर असलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीबाबत NASAने मोठी अपडेट दिली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये आलेल्या वृत्तानंतर नासाकडून विल्यम्स यांच्या प्रकृतीचे अपडेट देण्यात आले आहे. ISSवर असलेल्या सर्व अंतराळवीरांसह विल्यम्सची तब्येत चांगली आहे आणि त्यांचे नियमित वैद्यकीय मूल्यमापन केले जाते.
थोडक्यात
अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष
नासाने दिले विल्यम्स यांच्या प्रकृतीचे अपडेट
आयएसएसवरील सर्व अंतराळवीरांसह विल्यम्स यांची तब्येत चांगली आहे.
त्यांचे नियमित वैद्यकीय मूल्यमापन केले जाते.
विल्यम्स आणि सहकारी अंतराळवीर बॅरी विल्मोर यांचा ISS वर मुक्काम स्टारलाइनर स्पेसक्राफ्ट खराब झाल्यामुळे वाढवण्यात आला. जूनमध्ये सुरू झालेली त्यांची मूळ आठ दिवसांची मोहीम आता पुढील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये संपणार आहे.
नासाने आपल्या अंतराळवीरांच्या, विशेषत: सुनीता विल्यम्सच्या प्रकृतीचे अपडेट देणारे एक पत्रक जारी केले आहे. ISS वरील सर्व अंतराळवीर विशेषज्ञ फ्लाइट सर्जनद्वारे आयोजित नियमित वैद्यकीयला सामोरे जावे लागते. नासाचे प्रवक्ते जिमी रसेल यांनी डेली मेलशी बोलताना सांगितले की सर्व अंतराळवीरांची प्रकृती उत्तम आहे.
मागील दोन महिन्यांपासून अंतराळात अडकलेले नासाचे अंतराळवीर सुनिता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांना पुढील वर्षीच्या म्हणजे 2025 च्या फेब्रुवारी महिन्यात अंतराळातून पृथ्वीवर परत आणलं जाईल.
नासाने जाहीर केलंय की, हे दोन्ही अंतराळवीर ज्या बोईंग स्टारलायनर अंतराळयानातून अंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) वर गेले, ते यान आता त्यांच्याविनाच परतणार आहे.
या दोन अंतराळवीरांनी गेल्या 5 जूनला अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केलं होतं. त्यांची ही मोहिम 8 दिवसांची असणार होती. मात्र, आता त्यांना तब्बल 8 महिने अंतराळात थांबावं लागणार आहे.
स्टारलायनर हे अंतराळयान जेव्हा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाजवळ पोहोचले, तेव्हा त्यात बिघाड होऊन त्याचे 5 थ्रस्टर्स बंद पडले. हे थ्रस्टर्स यानाला दिशा देण्याचं काम करतात.
या यानातील हेलियम गॅसही संपल्यामुळे यानाला ज्वलनशील इंधनावर अवलंबून राहावं लागलं.
नासाने आपल्या अंतराळविरांना अंतराळात नेण्यासाठी बोईंग आणि स्पेस एक्स या कंपन्यांना कमर्शियल फ्लाईट्साठी कोट्यवधी डॉलरचं कंत्राट दिलं आहे.
बोईंगला 4.2 अब्ज डॉलर तर एलॉन मस्कच्या स्पेस एक्स कंपनीला 2.6 अब्ज डॉलरचे कंत्राट मिळाले आहे.
स्पेस एक्समध्ये दोन सीट्स रिकाम्या राहतील.
आतापर्यंत स्पेस एक्स या कंपनीने माणसांना घेऊन 9 अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. मात्र, यावेळी पाठवले जाणारे बोईंग यान हे मानवरहीत असेल.
बोईंग आणि नासाच्या वैज्ञानिकांनी स्टारलायनर या अंतराळयानातील तांत्रिक बिघाड समजून घेण्यासाठी खूप वेळ घालवला आहे.
त्यांनी आतापर्यंत पृथ्वीवर आणि अंतराळातही अनेक तपासण्या केल्या, डेटा एकत्र केला. त्यांना समस्येच्या मुळापर्यंत पोहोचून स्टारलायनर यानातूनच दोन्ही अंतराळवीरांना परत आणता येईल अशी आशा होती.
शनिवारी एका पत्रकार परिषदेत नासाचे संचालक बिल नेल्सन यांनी सांगितलं की, अवकाशात अडकलेल्या अंतराळयानात तांत्रिक सुधारणा करण्यासाठी नासा आणि बोईंग एकत्र मिळून काम करत आहेत.
ते म्हणाले की, "अंतराळात मोहिम आखणे हे जोखमीचे काम आहे. भलेही हे सर्वात सुरक्षित किंवा सवयीचं उड्डाण असेल, मात्र जेव्हा एखाद्या टेस्ट फ्लाईटचा विषय असतो तेव्हा ना ते सुरक्षित असतं ना सवयीचं. सुरक्षितता हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि तेच आमचं मार्गदर्शक तत्वही आहे."
आता फेब्रुवारी 2025 पर्यंत दोन्ही अंतराळवीरांचा अंतराळ स्टेशनवरील मुक्काम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून ते स्पेस एक्सच्या क्रु ड्रॅगन स्पेसक्राफ्टने परत येऊ शकतील.
या कालवधीत स्पेस एक्सला आपले पुढील यान लाँच करण्यास वेळ मिळेल. जे सप्टेंबरच्या शेवटी लॉंच केलं जाईल.
सुरुवातीला या यानातून 4 जण जाणार होते. मात्र आता अंतराळ स्थानकापर्यंत केवळ दोघेच जातील.
जेणेकरून या यानात सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांच्यासाठी जागा राहील. पुढील वर्षात फेब्रुवारीत जेव्हा हे यान पृथ्वीवर परतेल तेव्हा हे दोन्ही अंतराळवीर त्यातून परत येतील.