Sudhir Mungantiwar Team Lokshahi
ताज्या बातम्या

प्रबोधनपर मराठी चित्रपटाच्या अनुदानाची रक्कम एक कोटी करणार - सुधीर मुनगंटीवार

महान व्यक्ती आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांना अनुदान देण्यासंदर्भात, बुधवारी मंत्रालयात झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

Published by : Siddhi Naringrekar

महान व्यक्ती आणि सामाजिक विषयांवरील चित्रपटांना अनुदान देण्यासंदर्भात, बुधवारी मंत्रालयात झालेल्या सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीस सहायक अनुदान पन्नास लाखांवरून एक कोटी रुपये करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना येणाऱ्या वर्षात आशयघन चित्रपट आणि मालिकानिर्मिती करण्यात येईल. ज्यामुळे आजच्या‍ पिढीला यातून प्रेरणा मिळेल. या योजनेतून निर्माण झालेल्या मालिकांना आणि चित्रपटांना उत्तम व्यावसायिक यश बॉक्स ऑफिसवर मिळाले पाहिजे. त्यादृष्टीने या चित्रपटांचा दर्जा सर्वोत्कृष्ट राहावा, यासाठी चित्रपट व मालिका क्षेत्रातील नावाजलेल्या तज्ज्ञांसोबत सांस्कृतिक कार्य विभागाने काम करावे,असे त्यांनी सांगितले.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Latest Marathi News Updates live: सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज चर्चा होणार

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड