पंकजा मुंडे बीआरएसमध्ये आल्यास त्यांना मुख्यमंत्रीपद देऊ, असं चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, राष्ट्रभक्त- देशभक्त मतदार तुष्टीकरणाची नीती चालू देणार नाही. बीआरएसने पंकजा मुंडे यांना दिलेली ऑफर म्हणजे खडे टाकून बघण्याचा प्रकार आहे.
तसेच बीआरएस पक्ष महाराष्ट्रात येण्यासाठी प्रचंड घाईत आहे. मात्र महाराष्ट्रात काय आता तेलंगणामध्ये देखील बीआरएसचा मुख्यमंत्री होणे अशक्य आहे. पंकजा मुंडे राष्ट्रभक्तीने प्रेरित राजकारण करतात. ते या ऑफरला प्रतिसाद देणार नाहीत. असे मुनगंटीवार म्हणाले.