लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार लढणार अशी चर्चा सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, पक्षाने आदेश दिला तरच लोकसभा निवडणूक लढवेन. अन्यथा मला लोकसभेत जाण्याची इच्छा नाही. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माझी कोणतीही तयारी नाही. गेली तीस वर्षे मी राज्यात काम करतोय. या काळात अनेक पक्षातील नेत्यांशी, अधिकाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत.
तसेच राज्याला आणि जिल्ह्याला न्याय देण्याची संधी राज्यात अधिक आहे. त्यामुळे लोकसभेत जाण्याची माझी इच्छा नाही आणि तशी तयारीही मी सुरू केलेली नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.