Sudhir Mungantiwar Lokshahi
ताज्या बातम्या

Sudhir Mungantiwar: सुधीर मुनगंटीवारांनी विरोधकांवर फोडली डरकाळी, म्हणाले; "वाघनखं आणल्यानं काहींना पोटदुखी..."

छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षीत वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. १९ जुलैला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते सात्याऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे.

Published by : Naresh Shende

Sudhir Mungantiwar Press Conference : छत्रपती शिवाजी महाराजांची बहुप्रतिक्षीत वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाली आहेत. १९ जुलैला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याहस्ते सात्याऱ्यात भव्य दिव्य सोहळा पार पडणार आहे. लंडनच्या व्हिक्टोरीया अँड अलबर्ट म्यूझिएममधून शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणली आहेत. तीन वर्षांसाठी ही वाघनखं आणली असून त्यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अशातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखांबाबत माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

दाओसमध्ये महाविकास आघाडीचे नेते गेले. २० मे २०२२ ते २७ मे २०२२ या सात दिवसाचा खर्च हा ४ कोटी ५७ लाख ४८ हजार ६०१ रुपये आहे. मला आश्चर्य वाटतंय की, ज्यांनी इतका खर्च केला. वाघनखांसाठी १४ लाख रुपये सरकारचा खर्च झाला आहे, याची पोटदुखी या लोकांना झाली आहे. महाराष्ट्राच्या शिवभक्तांनी याची नोंद घेतली पाहिजे. राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांना आणण्याचं दृष्ट राजकारण केलं जात आहे, हे दुर्देवी आहे.

काही लोकांनी भाड्यानं आणली आहेत, असं सांगितलं. याचं एक रुपयाचंही भाडं आकारलं गेलं नाही. ब्रिटनच्या पंतप्रधानांशी, म्युझियमच्या लोकांशी हा पत्रव्यवहार केला. या संदर्भात मनात काही शंका असेल, तर राजकारण करण्याऐवजी त्यांना मुख्यमंत्री किंवा आमच्यापैकी कुणाचीही भेट घेता आली असती. त्यांच्याकडे कागदपत्रे देऊन त्यांच्या मनातील शंकेचं निरसन करता आलं असतं. राज्याभिषेकाच्या समारोहाच्या संदर्भात पहिल्यांदा महाविकास आघाडीने टीका केली. ते म्हणतात हे ३५० वे वर्षच नाही.

खरंतर २ जून २०२३ ला ३५० वा राज्याभिषेक आणि पूर्ण वर्ष आपण साजरं केलं. पण दुर्देवाने काही लोक खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारही त्यांना नकोसा झाला आहे. खुर्चीचं राजकारण इतक्या खालच्या दर्जावर गेलं आहे की आता अफजल खानाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण आम्ही काढलं.

पण आमच्या राज्याचं दुर्देवं होतं की, ५ मे २००८ ला अफजलखानाच्या कबरीचं उदात्तीकरण करणाऱ्या संस्थेनं ठराव केला होता. पण पाच वर्षात ते कागदपत्र जोडू शकले नाहीत. म्हणून पुन्हा एकदा ते अतिक्रमण हटवता आलं. महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या शिवभक्तांना विनंती करायची आहे, वाघनखं चार ठिकाणी तीन वर्षांसाठी ठेवण्यात येणार आहेत. तुम्ही निश्चितपणे दर्शन घ्या. ही वाघनखं आमच्यासाठी उर्जा, प्रेरणा देणारी आहेत, असंही मुनगंटीवार म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी