सूरज दहाट, अमरावती
अमरावती महापालिका सफाई कंत्राटदारांकडून कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. पालिकेकडे 11 कोटींची थकबाकी असल्याने हे कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. 7 महिन्यांची तब्बल 11 कोटी रुपयांची देयके थकीत आहे.
15 दिवसांपासून सूचना दिल्यानंतर देखील अमरावती मनपाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. याच पार्श्वभूमीवर आजपासून सफाई कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन केलं आहे.
त्यामुळे आता उद्या महात्मा गांधी जयंतीपासून सुरु होणाऱ्या स्वच्छता उपक्रमावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.