ताज्या बातम्या

शरीर शौष्ठवसाठी स्टीराँईड इंजेक्शन व काम्मोत्तेजक औषधांच्या बेकायदेशीर विक्री

Published by : Sagar Pradhan

रिद्धेश हातिम|मुंबई : अन्न व औषध प्रशासन महा. राज्य विभाग राज्यात जनआरोग्य वर्धनासाठी गुणवत्तापूर्ण, सुरक्षित, परिणामकारक व औषधांचे उत्पादन व विक्री व वितरण याचे नियमन करते. मात्र प्रशासनाच्या मुख्यालयातील गुप्तवार्ता विभागास मुंबईत शरीर शौष्ठवसाठी स्टेराॅईड इंजेक्शन व इतर औषधाचे बेकायदेशीर विक्री वितरण होत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती संकलित केली होती. त्याच आधारे प्रशासनाच्या गुप्तवार्ता व बृहन्मुंबई विभागाच्या अधिकाऱ्यांनी भगवती रुग्णालय, एस. व्ही. रोड बोरीवली या ठिकाणाजवळ स्थानिक पोलिसांची मदत घेऊन सापळा रचला व बनावट ग्राहकस स्टेराॅईड इंजेक्शन व काम्मोत्तेजक औषधे देतांना एका इसमास रंगेहात पकडले.

ही औषधे कोशेर फार्मासुटीकल यांच्या आनंद भवन अपार्टमेंट , एस. व्ही रोड बोरीवली (प) या जागेतून पुरवठा करण्यात आल्याच्या माहिती मिळताच छापा टाकून जागेत मोठ्या प्रमाणवर विविध प्रकारची अँनाबोलिक स्टेराॅईड इंजेक्शन जसे Testosterone, Oxandrolone , Stanozolol, Estradiol , Mesterolone, Boldenone, Nandrolone, Adenosine Mono Phosphate, etc व काम्मोत्तेजक औषधे जसे Sildenafil, Tadalafil Tablets चा मोठा साठा विक्रीसाठी साठविण्यात आला असल्याचे निदर्शनास आले.

जागेचा प्रशासनात कोणताही औषध विक्री परवाना मंजूर नसल्यामुळे संस्था विनापरवाना स्टीराँईड इंजेक्शन सारख्या केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व अत्यावश्यक प्रकरणात असाध्य आजारांवर उपयोगी असलेली संवेदनशील औषधे विनापरवाना व गैरवापर करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर पद्धतीने विक्री वितरण करत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपलब्ध साठ्यातून प्रातिनिधिक नमुने चाचणी साठी घेण्यात आले व उर्वरित औषधसाठा मूल्य रु ५१.२७ /- लक्ष औषधे सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० च्या कलम १८ (c) चे उल्लंघन झाल्याने जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणात इतर काही व्यक्तींचा संगनमताने सहभाग असल्याच्या संशयावरून पुढील तपासासाठी एम. एच. बी. वसाहत पोलीस स्टेशन, बोरीवली(प) मुंबई यथे भा. दं. संहितेच्या संबंधित कलमाखाली गुन्हा क्र. ४३/२०२३ दि. २५/०१/२०२३ नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान प्रशासनाद्वारे जनतेस आवाहन करण्यात येते की कोणत्याही प्रकारची औषधे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करावी व परवाने धारक औषध विक्रेत्याकडून योग्य खरेदी बिल प्राप्त करून खरेदी करावी.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा