सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
मध्यरात्री 3 च्या सुमारास LCBने कोल्हापुरातून चेतन पाटीलला ताब्यात घेतलं आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. या प्रकरणात चेतन पाटील हा फरार होता.
आता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कोल्हापूर पोलिसांनी संशयित चेतन पाटीलला मालवण पोलिसांकडे दिलं आहे.