राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षा बोर्डाने एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकटामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव सकमी झाल्याचं पालकांचं मत आहे. विद्यार्थी हित लक्षात घेऊन व पालक विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून दहावी बारावी बोर्ड परीक्षेत प्रत्येक पेपरच्या निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे परीक्षेसाठी वाढून मिळणार आहे.
दहावी बारावी बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका निर्धारित वेळेच्या दहा मिनिटे आधी आकलनासाठी वाचनासाठी दिल्या जात होत्या. मात्र यामुळे कॉपीच्या घटना समोर येत असल्याने दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका देण्याचा नियम बोर्डाने या वर्षीपासून रद्द केला आहे. मात्र विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त वेळ मिळणार आहे.
या संदर्भातील सुधारणा बोर्डाने परिपत्रक काढून जारी केले आहेत.