सुरेश वायभट | पैठण: पैठण येथे श्रीराम कथा सोहळ्याला सुरुवात झाली आहे. विलासबापु संदिपान भुमरे यांच्यावतीने या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून शोभा यात्रेचा प्रारंभ झाला.
यावेळी रेणुकादेवी शरद साखर कारखान्याचे चेअरमन विलासबापु भुमरे, नंदलाल काळे, राजुनाना भुमरे, दादा बारे, शहादेव लोहारे, महिलाआघाडीच्या पुष्पाताई भुमरे, वर्षाताई भुमरे, पुष्पाताई गव्हाणे, ज्योतीताई पठाडे, अश्विनी लखमले, नम्रता पटेल यांच्यासह नागरिकांनी शोभायात्रात सहभागी झाले.
संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील कथा स्थळावर प्रभु श्रीरामाचे विलासबापू भुमरे व राजुनाना भुमरे यांनी सपत्नीक यांच्या हस्ते पुजन करुन श्रीराम कथेला ह.भ.प.समाधान महाराज शर्मा यांच्या आमृत वाणीतून प्रारंभ करण्यात आला. या श्रीराम कथेचा भाविकांना कथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन विलासबापु भुमरे व श्रीराम कथा आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले.