Sri Lanka Crisis Team Lokshahi
ताज्या बातम्या

Sri Lanka Crisis : गोटाबाया राजपक्ष्येंनी आंदोलकांच्या भीतीमुळे शासकीय निवासस्थानातून काढला पळ

श्रीलंकेत गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक दिवाळखोरीमुळे जनता राजपक्ष्ये परिवाराविरुद्ध रस्त्यावर उतरलेली आहे.

Published by : Sudhir Kakde

कोलंबो : वादग्रस्त ठरलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शनिवारी राजधानीतील त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून पळ काढल्याचं वृत्त समोर आलं आहे. संरक्षण क्षेत्रातील एका सूत्राने ए. एफ.पी. या वृत्त संस्थेला याबाबत माहिती दिली आहे. त्यापूर्वी, काही व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलक त्यांच्या निवासस्थानामध्ये घुसून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत असल्याचं दिसून आलं. अशा स्थितीत स्वत:ला धोका असल्याचं पाहून त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. "राष्ट्रपतींना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे." असं सूत्राने सांगितलं. संतप्त जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी सैनिकांनी हवेत गोळीबार केल्याचंही ,समोर आलं आहे.

आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिसांसह सात जण जखमी झाले आहेत. हजारो आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसण्याच्या प्रयत्नात पोलिसांनी लावलेले बॅरियर्स तोडले आहेत. यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी निदर्शनांपूर्वी संचारबंदी उठवली. सरकारविरोधी निदर्शनं रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये ही संचारबंदी लागू करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम प्रांतातील सात पोलिस विभागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नेगोम्बो, केलानिया, नुगेगोडा, माउंट लॅव्हिनिया, नॉर्थ कोलंबो, दक्षिण कोलंबो आणि कोलंबो सेंट्रल या भागांचा यामध्ये समावेश आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून पुढील सूचना मिळेपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी ही घोषणा करताना पोलिस महानिरीक्षक (IGP) सीडी विक्रमरत्ने म्हणाले, "ज्या भागात संचारबंदी लागू करण्यात आली, त्या भागात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घरातच राहावं. संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल."

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी