स्पाईसजेटच्या विमानांमध्ये सततच्या तांत्रिक बिघाडामुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) मोठी कारवाई केली आहे. DGCAने 8 आठवड्यांसाठी Spicejet च्या 50% फ्लाइट्सवर बंदी आणली आहे. या आठ आठवड्यांसाठी Spicejet ची विमाने अतिरिक्त निगराणीखाली ठेवण्यात येईल. दुसरीकडे, Spicejetला भविष्यात 50 टक्क्यांहून अधिक विमानांचे उड्डाण करायचे असेल, तर त्यांच्यांकडे त्यासाठी क्षमता, पायाभूत सुविधा आणि कर्मचारी उपलब्ध असल्याचे सिद्ध करावे लागेल.
DGCA स्पाइसजेटला नोटीस दिली होती. त्यांच्या विमानांमध्ये वारंवार होणाऱ्या तांत्रिक त्रुटी लक्षात घेऊन ही नोटीस पाठवली होती. सरकारने राज्यसभेत उत्तर देताना सांगितले की, DGCA ने स्पाइसजेटच्या विमानांचे स्पॉट चेकिंग केले आहे. त्या तपासणीत कोणतीही मोठी त्रुटी सापडली नाही. परंतु डीजीसीएने सर्व प्रकारच्या तांत्रिक बिघाड दूर झाल्यावरच स्पाईस जेटने आपली १० विमाने वापरावीत, असे स्पष्ट केले होते.
8 वेळा तांत्रिक बिघाड
18 दिवसांत स्पाइसजेटच्या विमानांमध्ये 8 वेळा तांत्रिक बिघाड आढळून आला. या कारणास्तव डीजीसीएला विमान कंपनीला नोटीस पाठवावी लागली. विमानांमध्ये सातत्याने होत असलेल्या बिघाडामुळे प्रवाश्यांनी तक्रारी केल्या होत्या.