SpiceJet | emergency landing  team lokshahi
ताज्या बातम्या

Spicejet चं मोठं नुकसान; उड्डाणांमध्ये अडचणी, DGCA ची कारवाई अन् आता शेअर बाजारात फटका

DGCA ने एअरलाइनच्या सध्याच्या मंजूर फ्लाइटपैकी 50 टक्के उड्डाणांवर बंदी घातली आहे.

Published by : Sudhir Kakde

नवी दिल्ली : स्पाईसजेट एअरलाइन्स गेल्या काही काळापासून अडचणीत आली आहे. मागच्या काही आठवड्यांपासून कंपनीच्या विमानांना उड्डाणांमध्ये समस्या येत असून, DGCA म्हणजेच हवाई वाहतूक नियामक महासंचालनालयाने बुधवारी या एअरलाइनवर कारवाई करत या एअरलाइनच्या सध्याच्या मंजूर फ्लाइटपैकी 50 टक्के उड्डाणांवर बंदी घातली आहे. त्याचा परिणाम गुरुवारी शेअर बाजारात दिसून आला. बाजारात आज स्पाइसजेटचे शेअर 10 टक्क्यांपर्यंत घसरले. दुपारी 2.25 च्या सुमारास, शेअर्स 1.50 अंकांनी अर्थात 3.97% खाली घसरले. 36.30 रुपये प्रति शेअरवर आज व्यवहार सुरु होता. स्पाईस जेट कंपनी नेमकी का अडचणीत आली थोडक्यात समजून घेऊ.

स्पाइसजेटमध्ये काय समस्या होत्या?

2 जुलै रोजी जबलपूरला जाणाऱ्या फ्लाइटच्या क्रू मेंबर्सच्या केबिनमध्ये सुमारे 5,000 फूट उंचीवर गेल्यावर धूर येत असल्याचं दिसलं. त्यानंतर विमान दिल्लीला परतलं. 5 जुलै रोजी चीनच्या चोंगकिंग शहराला जाणारं स्पाइसजेटचे मालवाहू विमान हवामान रडार प्रणालीतील बिघाडामुळे कोलकात्याला परतलं. त्याच दिवशी, स्पाइसजेटचं दिल्ली-दुबई विमान इंधन निर्देशकामध्ये (Fuel Indicator) बिघाड झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आलं. त्यानंतर स्पाईसजेटच्या Q-400 विमानाचं 23,000 फूट उंचीवर विंडशील्ड क्रॅक झाल्यानंतर मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडींग करण्यात आलं. 19 जून ते 5 जुलै दरम्यान स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या किमान आठ घटना घडल्या. यानंतर 6 जुलै रोजी DGCA ने एअरलाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली.

डीजीसीएने सांगितलं की त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एअरलाइन्सचं आर्थिक लेखापरीक्षण केलं होतं. त्यामध्ये असं आढळलं होतं की, कंपनी आवक कमी करत होती आणि पुरवठादार आणि विक्रेत्यांना नियमितपणे पेमेंट करत नव्हती. त्यामुळे काही भागांची कमी भासत होती. एअरलाइन्समधील अंतर्गत सुरक्षेची स्थिती खराब आहे आणि देखभाल सुद्धा व्यवस्थित केली जात नाही.

डीजीसीएने बुधवारी सांगितलं की, सुरक्षित आणि विश्वासार्ह वाहतूक सेवा सुरू ठेवण्यासाठी स्पाइसजेटनं सादर केलेल्या विविध स्थळांची तपासणी आणि कारणे दाखवा नोटिसांना दिलेला प्रतिसाद पाहता, स्पाइसजेटच्या उन्हाळ्यासाठी आठ आठवड्यांसाठीच्या उड्डानांमध्ये 50 टक्के घट केली जावी. या आठ आठवड्यांमध्ये नियामक एअरलाइन्सवर बारीक नजर ठेवेल. आदेशानुसार, एअरलाइन्सला पुढील आठ आठवड्यांसाठी 2096 पेक्षा जास्त उड्डाणं रद्द करावी लागणार आहे.

स्पाईसजेट एअरलाइन्सने काय म्हटलं?

एअरलाइन्सने सांगितलं की, त्यांना डीजीसीएचा आदेश मिळाला असून, त्याचं पालन ते करणार आहे. तसंच, एअरलाइन्सने म्हटलं आहे की, नियामकाच्या आदेशामुळे स्पाईसजेट त्यांची कोणतीही उड्डाणे रद्द करणार नाही, कारण सध्याच्या स्थितीत कमी प्रवाशांमुळे उड्डाणं कमी करण्यात आली आहेत.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news