ताज्या बातम्या

अजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर. आर. पाटलांच्या मुलीचे उत्तर; म्हणाल्या...

कवठे-महांकाळ या ठिकाणी घेतलेल्या सभेत महाराष्ट्राचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर आरोप केला.

Published by : Siddhi Naringrekar

कवठे-महांकाळ या ठिकाणी घेतलेल्या सभेत महाराष्ट्राचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गंभीर आरोप केला. आर. आर. पाटील यांनी केसाने गळा कापला असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.

यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी केलेल्या आरोपांना आर आर पाटील यांची मुलगी स्मिता पाटील यांनी उत्तर दिलं आहे. स्मिता पाटील म्हणाल्या की, दादांनी आबांच्या पश्चात आमचंल पालकत्व स्विकारले होते फक्त आमच्या कुटुंबियांचेच नाही तर तासगाव कवठेमहांकाळमधल्या जनतेचं, महाराष्ट्रातल्या तमाम आबाप्रेमींचं त्यांनी पालकत्व स्विकारलं होते.

आज साडेनऊ वर्षानंतर दादा ही खदखद व्यक्त करत आहेत आबांच्याविषयी खरंच याचे वाईट वाटत आहे. कारण दुसरं कोणी बोलले असते तर त्याचे एवढे वाईट वाटलं नसते. पण ज्या दादांनी आमचं पालकत्व स्विकारले. तेच दादा आज तासगाव कवठेमहांकाळमध्ये येऊन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची खदखद व्यक्त करत आहेत. त्याचे प्रचंड दु:ख वाटते आहे. असे स्मिता पाटील म्हणाल्या.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...