भारत-चीन संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. मात्र आता मोठी बातमी समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर येत आहे. दोन्ही देशाच्या सैन्यामध्ये झालेल्या झडपमध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. या झटापटीत दोन्ही देशांचे सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे.
माहितीनुसार, संबंधित घटना ही 9 डिसेंबरला घडलीय. या संघर्षानंतर दोन्ही बाजूच्या सैनिकांनी मागे हटण्याचा निर्णय घेतला आहे.संबंधित घटना तीन दिवसांपूर्वी घडली होती. पण आता अधिकृतरित्या या घटनेबाबत माहिती देण्यात आली. भारतीय सैनिकांची एक टीम तवांगमध्ये गस्त घालत होती त्यावेळी चिनी सैन्याचं पथकही तिथे आलं. यावेळी दोन्ही बाजूच्या सैनिकांमध्ये वाद झाला. याआधी ऑक्टोबर 2021 मध्ये अरुणाचल प्रदेशातील यांगसे येथे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता.