Shubman Gill 
ताज्या बातम्या

GT vs CSK : शुबमन गिलच्या नावावर 'या' जबरदस्त विक्रमाची नोंद, अहमदाबादच्या मैदानात पाडला धावांचा पाऊस

Published by : Naresh Shende

Shubman Gill IPl 2024 Record : आयपीएल २०२४ चा ५९ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला. या सामन्यात गुजरातने चेन्नईचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयामुळे गुजरात प्ले ऑफच्या शर्यतीत टीकून राहिला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात गुजरातचा कर्णधार शुबमन गिलने धडाकेबाज फलंदाजी करून शतकी खेळी केली. गिलने आयपीएल करिअरचं चौथं शतक ठोकून एका मोठ्या विक्रमालाही गवसणी घातली आहे. एकाच मैदानावर सर्वात कमी टी-२० इनिंगमध्ये १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज म्हणून शुबमन गिलची नोंद करण्यात आलीय. गिलने हा कारनामा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये केला.

शुबमन गिलने अहमदाबादच्या या नवीन स्टेडियममध्ये २०२१ मध्ये पहिला टी-२० सामना खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत शुबमन गिलने १० इनिंग खेळल्या आहेत. त्याने ७१.९३ च्या सरासरीनं आणि १६३.२३ च्या स्ट्राईक रेटने १०७९ धावा कुटल्या आहेत. त्याने चार शतक आणि चार अर्धशतक ठोकण्याची चमकदार कामगिरीही केलीय. त्यामुळे गिलला एकाच मैदानात सर्वात वेगवान १००० धावा करण्यात यश आलं आहे.

यापूर्वी एकाच मैदानात १ हजार धावा करण्याचा कारनामा पाच फलंदाजांनी केला होता. यामध्ये ख्रिस गेल (बंगलोर), डेविड वॉर्नर (हैदराबाद), एरोन फिंच (ओवल), बाबर आझम (रावलपिंडी) आणि मोहम्मद रिजवान (कराची) या फलंदाजांच्या नावाचा समावेश आहे. या फलदाजांना एकाच मैदानावर १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी २२ इनिंग खेळाव्या लागल्या.

गुजरात टायटन्सचा दणदणीत विजय

गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करून २० षटकांत ३ विकेट्स गमावून २३१ धावा केल्या. यामध्ये शुबमन गिल आमि साई सुदर्शनच्या शतकी खेळीचा समावेश आहे. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ८ विकेट्स गमावून १९६ धावाच करता आल्या. त्यामुळे चेन्नईचा या सामन्यात दारूण पराभव झाला.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा