10 दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडका बाप्पा आज निरोप घेत आहे. दहा दिवसाचा उत्साहात गणेशोत्सव साजरा केल्यानंतर भाविक आज लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत. अनंत चतुर्दशी निमित्त ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर श्रॉफ बिल्डिंगमधून बाप्पावर पुष्पवृष्टी करण्यात येत असते. या पुष्पवृष्टीसाठी तब्बल 900 किलो फुले आणण्यात आले आहेत.श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टीला यंदा 54 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी पुष्पवृष्टीसाठी 700किलो फुले असतात
यावर्षी प्रत्येक मोठ्या गणपती बाप्पासाठी 900 किलो झेंडूची फुले आणण्यात आली आहेत. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी श्रॉफ बिल्डिंग परिसरात मोठी गर्दी असते. इंद्रदेव आणि ऐरावत असं एक आगळे वेगळे डेकोरेशन श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाच्या वतीने केले आहे.