अंबरनाथमधील शासकीय विश्रामगृहाचं आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र यावेळी विश्रामगृहातील पलंगावर टाकलेल्या चादरी पाहून श्रीकांत शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले.
विश्रामगृहाचं उद्घाटन केल्यानंतर श्रीकांत शिंदे हे आतमध्ये खोल्या पाहण्यासाठी आले. यावेळी बेडवर टाकलेल्या चादरी अतिशय निकृष्ट दर्जाच्या असल्याचं त्यांना दिसलं. त्यामुळे PWD अधिकारी कुठे आहेत? त्यांना बोलवा असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. यानंतर चादरींसाठी तुमच्याकडे नाहीत का? चांगल्या चादरी टाकल्या पाहिजेत, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. त्यावर अधिकाऱ्यांनी चादरी बदलण्यास सांगतो, असं म्हटल्यानंतर शिंदे शांत झाले. परंतु विश्रामगृहावर इतका खर्च केल्यानंतर चादरी अक्षरशः मृतदेहावर टाकायच्या क्वालिटीच्या दिसल्यानं शिंदेंना संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.