ताज्या बातम्या

Shravan Somvar : परळीतील वैद्यनाथ मंदिर विद्युत रोषणाईने सजले

आज श्रावणातील पहिला सोमवार आणि याच निमत्ताने बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर आकर्षक अशा विद्युत रोषणाई

Published by : Siddhi Naringrekar

विकास माने, बीड

आज श्रावणातील पहिला सोमवार आणि याच निमत्ताने बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिर आकर्षक अशा विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आरासाने सजले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात विविध प्रकारच्या फुलांची आरास करून मंदिर परिसर प्रसन्न झाले आहे. तब्बल 25 क्विंटल फुल यासाठी लागले असून यात निशिगंधा, गुलाब, जरबेरा, झेंडू यासह विविध प्रकारच्या फुलांचा समावेश आहे.

धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने ही आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास सजवण्यात आलीय. पुणे, हैदराबाद आणि सोलापूर या ठिकाणाहून ही फुलं आणण्यात आलीय. राज्याचं नाही तर परराज्यातून भाविक वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी येत असतात. आणि याच भाविकांची सोय व्हावी, याकरिता मंदिर कमिटीने व्यवस्था केलीय. पिण्याच्या पाण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती