महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पक्षाच्या उमेदवाराचा प्रचारात सहभागी न होणे, युवक काँग्रेसच्या उपक्रमात सक्रिय सहभाग न घेणे या कारणासाठी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शिवानी वडेट्टीवारांसह काही पदाधिकाऱ्यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. अखिल भारतीय युवक काँग्रेसकडून ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती आहे.