अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक रॅलीवर गोळीबार करण्यात आला. गोळीबारात माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. दुर्घटनेत एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेच्या पेन्सिलवेनिया शहरात रॅलीवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दोन हल्लेखोरांना ठार करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे.
अमेरिकेत लवकरच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यानुसार, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातच त्यांची शनिवारी पेनसिल्व्हेनिया येथे प्रचारसभा झाली. या प्रचारसभेत त्यांच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केला. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात ट्रम्प यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागाला गोळी लागली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निवडणूक रॅलीमध्ये एकापाठोपाठ अनेक राऊंड गोळीबार करण्यात आला. सीक्रेट सर्व्हिसने त्याला तत्काळ घटनास्थळाच्या बाहेर नेले. सीक्रेट सर्व्हिस आणि ट्रम्प यांचे प्रवक्ते या दोघांनी सांगितले की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ठीक आहेत.