ताज्या बातम्या

धक्कादायक! घरातच पूरला मृतदेह, त्यावरच झोपायचे वडील

धक्कादायक प्रकार;कारण एकूण व्हाल थक्क

Published by : shweta walge

भूपेश बारंगे,वर्धा : सेवाग्राम परिसरातील आदर्श नगर मध्ये वेडसर मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला. मुलीचे अंत्यविधी करण्यासाठी पैसा नसल्याने वडील व भावाने घरातच खड्डा खोदून बहिणीचा मृतदेह पूरला. ही धक्कादायक घटना 10 दिवसांपूर्वी घडली. आदर्श नगर येथे राहत असलेलं भस्मे कुटूंबमध्ये प्रवीणा साहेबराव भस्मे,वय 37 असे मृत तरुणीचे नाव आहे. तर सेवाग्राम पोलिसांनी साहेबराव चिंधुजी भस्मे वय 68वर्ष,मंदा साहेबराव भस्मे वय 64, प्रशांत साहेबराव भस्मे वय 35 यांना ताब्यात घेतल्याची माहीती आहे.

घरातील काही जण वेडसर असून मृतक तरुणीचे वडील व भाऊ रोजमजुरी करून कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. यातच प्रवीणा ही काही महिण्यापासून आजारी होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिच्यावर उपचार करण्यात आला नसावा असे सांगितले जात आहे.यातच तिचा 3 जुलैला घरीच निधन झाले. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने अंत्यविधी करायचा कसा यासाठी पैसे आणायचे कुठे असे अनेक प्रश्न कुटुंब समोर उपस्थित झाले होते.रात्रभर विचार करून सकाळी घरातच खड्डा खोदून प्रवीणाचा मृतदेह पूरला.गोपनीय माहिती पोलिसांना कळताच काल सायंकाळच्या सुमारास भस्मे यांच्या घरात पोलिसांनी पाहणी केली असता घरातच खोदलेला आढळून आले. याबाबत तहसीलदार यांना माहिती देऊन घटनास्थळी गाठून मृतदेह पाऊण तास खोदकाम करून बाहेर काढण्यात आला.यावेळी फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले होते.त्यानंतर घटनास्थळी मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.लगेच नजीकच्या स्मशानभूमीत त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती.

पुरलेल्या मृतदेहावरच वडील झोपायचे

भस्मे कुटुंबातील सर्वच सदस्य वेडसर प्रवृत्तीचे असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यातच प्रवीणा मृतदेह घरातच खड्डा खोदून त्या पूरला. त्यावर लाकडी पाट्या टाकून चक्क वडील दररोज झोपायचा. बाजूला भाऊ पलंगावर झोपत असायची ही धक्कादायक घटना दहा दिवसानंतर उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण