ताज्या बातम्या

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर

Published by : shweta walge

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नेते बाबा सिद्दीकी यांचा अखेर गोळीबारात मृत्यू झाला आहे. बांद्र्यातील झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयावर जवळ बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील चार आरोपीना ताब्यात घेतलं आहे. याच प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी गुरूनेल सिंगच्या माहितीनुसार हरियाणाच्या कत्तर जेलमध्येच गुरूनेल सिंग जिशान अख्तरच्या संपर्कात आल्याची माहिती दिली आहे.

हरियाणाच्या कत्तर जेलमध्येच गुरूनेल हा आरोपी जिशान अख्तरच्या संपर्कात आल्यानंतर त्याने भारतात न राहण्याची इच्छा बोलून दाखवली होती.त्यावेळी जिशान अख्तरने त्याला परदेशात पाठवण्याचे आश्वासनही दिले होते. याच दरम्यान जिशान अख्तरने गुरूनेलला या हत्येच्या कटात सहभागी करून घेतले तसेच बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचा कट यशस्वी झाल्यानंतर आरोपी जिशान अख्तरने गुरूनेलला परदेशात पाठवण्यात येईल असे सांगितले होते.

मात्र घडलं नेमकं उलटं बाबा सिद्धीकी यांच्या हत्येनंतर गुरूनेल हा पोलिसांच्या हाती लागला. मात्र शुभम आणि जिशान अख्तर हे पळून जाण्यात यशस्वी ठरले. हा हल्ला होण्याच्या दोन दिवसापूर्वीपासूनच शुभम हा भूमिगत झाला, तर जिशान अख्तरही राज्याबाहेर पळून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही देशसोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुशंगाने लूक आऊट नोटीसही जारी करण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Manoj Jarange on BJP ; मराठा समाज भाजपचं राजकीय एन्काऊंटर करणार, जरांगे पाटील यांचा इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजप मुंबईत भाकरी फिरवणार?

Vidhansabha Election 2024 : मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक! या तारखेपर्यंत करता येणार नाव नोंदणी

Nikita Porwal: मिस इंडिया 2024 च्या स्पर्धेत उज्जैनची निकीता पोरवालने मारली बाजी, पाहा "हे" फोटो

आंबेडकरी चळवळीला मोठा धक्का! सांगोल्यातील 'गोल्ड मॅन' सुरज बनसोडे यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन