ताज्या बातम्या

शिवसेनेचा दसरा मेळावा; आझाद मैदानावरुन एकनाथ शिंदेंची तोफ धडाडणार

शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नवरात्रौत्सवात 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून वेगवेगळे दसरा मेळावे घेतले जातात.

विधानसभा निवडणुकीपूर्वीचा हा मेळावा असल्याने हा दसरा मेळावा महत्वाचा असणार आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईच्या आझाद मैदानात होणार आहे.

आझाद मैदानात दसरा मेळाव्याची जोरदार तयारी करण्यात आली असून शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

यातच विधानसभेची आचारसंहिता कधीही लागू शकते दसरा मेळाव्यातून काय घोषणा केली जाते आणि एकनाथ शिंदे या दसरा मेळाव्यातून काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

पुणे एअरपोर्टवरील 11 विमाने उडवून देण्याची धमकी

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

निफाड तालुक्यातील भाजपचे यतीन कदम शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे रवाना

पिंपरी-चिंचवडच्या भोसरीत पाण्याची टाकी कोसळली; 2 ते 3 कामगारांचा मृत्यू