मुंबई | सुरेश काटे : राज्यात मशिदीवरील भोंग्यांचा वाद सुरू असताना शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावरून नवीन वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दादर (Dadar) येथील शिवाजी पार्क मैदान रमजान ईद (Ramzab Eid) निमित्ताने मुस्लिम बांधवांना नमाज पठण करण्यासाठी शासनाने उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ऍड. नाय्युम शेख यांनी केली आहे. औरंगाबाद खंडपीठामध्ये (Aurangabad Bech of Mumbai High Court) वकीली करणारे ऍड.नय्युम शेख यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे त्याचप्रमाणे बृहन्मुंबई सह आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे एक दिवस मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने नमाज पठन करण्यासाठी शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे.
शिवाजी पार्क हे मैदान पाच दिवस धार्मिक, सांस्कृतिक, सार्वजनिक, कार्यक्रमासाठी शासनाने राखीव ठेवले आहे. यातील एक दिवस मुस्लिम बांधवांच्या ईद या पवित्र सणानिमित्त नमाज पठण करण्यासाठी शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी केली नय्युम शेख यांनी केली आहे. शासनाने सोमवारपर्यंत मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून दिले नाही, तर कोर्टात दाद मागण्यात येणार असल्याची माहिती ऍड शेख यांनी दिली आहे.