बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या ट्विटनंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबईच्या कोस्टल रोडचे कौतुक करणारे ट्विट केले होते. कोस्टल रोड रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटातील शिवसेना आणि भाजपमध्ये ट्वीटर वॉर सुरू आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मुंबई कोस्टल रोडचे कौतुक केले आणि लिहिले की, JVPD, जुहू ते मरीन ड्राइव्ह असा प्रवास करण्यासाठी 30 मिनिटे लागली. स्वच्छ आणि चांगला रस्ता असे त्यांनी वर्णन केले. बिग बींच्या या ट्विटवर भाजप समर्थकांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. भाजप आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून हा रस्ता तयार झाल्याचे या सर्वांचे म्हणणे आहे. त्याचवेळी आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
अमिताभ बच्चन यांचं ट्विट
'कामाला निघालो.. सी लिंकनंतर कोस्टल रोड आणि बोगदा अंडरग्राउंड.. JVPD, जुहू ते मरीन ड्राइव्ह, 30 मिनिटे..! व्वा! कसली कमाल ! नवीन मोठा स्वच्छ रस्ता , कोणतेही अडथळे नाहीत'
बिग बींच्या या ट्विटवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हणाले की,
'परंपरा, प्रतिष्ठा, शिस्त, हे या सरकारचे तीन स्तंभ आहेत
हेच आदर्श आहेत ज्यांच्या सहाय्याने आपण भारतीयांचा उद्या निर्माण करतो...
अमिताभ बच्चन जी तुमची प्रवास कथा शेअर केल्याबद्दल धन्यवाद...'
देवेंद्र फडणवीसांच्या या ट्विटवरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ट्विट करत म्हणाले की,
'कोस्टल रोडचे श्रेय भाजप महाराष्ट्राने घेतले हे पाहणे हास्यस्पद आहे.
कोस्टल रोड हा एक प्रकल्प आहे ज्याच्याशी भाजपचा काहीही संबंध नाही, शिवाय केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या परवानगीसाठी 2 वर्षे उशीर केला...
हा प्रकल्प शिवसेना ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची कल्पना आहे.
स्वतःहून न केलेल्या कामांसाठी नेहमीप्रमाणेच श्रेयासाठी हताश असलेल्या भाजपचे पदाधिकारी रिट्विट करत आहे...'