Nana Bhangire Team Lokshahi
ताज्या बातम्या

पुण्यात शिवसेनेला पहिला धक्का; माजी नगरसेवक नाना भानगिरे शिंदे गटात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर अनेक धक्के महाविकास आघाडीला बसत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नावाची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर अनेक धक्के महाविकास आघाडीला बसत आहेत. राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातून शिवसेनेला (shivsena)एक धक्का बसला आहे.

शहरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी (Nana Bhangire)अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केलाच. मुख्यमंत्री शिंदे शनिवारी रात्री दिल्लीहून पुणे मार्गे पंढरपूरला जाणार होते. भानगिरे यांनी हडपसरमध्ये त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम घेतला.

दे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आल्यानंतर पुरंदरमधील माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सर्वप्रथम शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता शिवसेनेचे माजी नगरसेवक नाना भानगिरे शिंदे गटात सामील झाले आहेत.

भानगिरे हडपसरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही प्रवेश केला होता. तेथून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात पराभव झाल्यानंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले. त्यानंतर दुसऱ्यांदा नगरसेवक झाले.

Amit Thackeray : माहीममधून उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ashok Hinge: वंचितला मोठा धक्का! विधानसभेच्या तोंडावर अशोक हिंगे यांचा राजीनामा

Shivsena Vidhansabha Candidate: ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांचा पत्ता कट?; कोण आहेत ते आमदार ?

Priyanaka Gandhi : प्रियांका गांधी उमेदवारी अर्ज भरणार; पाहा वायनाडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन

Ajit Pawar: ठरलं तर! अजित पवार बारामतीतून निवडणूक लढवणार