शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. वयाच्या 52व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला असून पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम दाखल करण्यात आलं होतं.
पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
विनायक मेटे कोण होते
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार होते. त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य