जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. आबे यांना दोन गोळ्या लागल्या. दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली, ज्यामुळे ते जमिनीवर पडले. गोळी लागल्यानंतर त्यांनी हदयविकाराचा झटका आला. उपचार सुरु असलेल्या शिंजो आबे यांचं निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतात शनिवारी एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येणार आहे.
भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता आबे यांच्यांवर गोळीबार करण्यात आला. दोन गोळ्यांपैकी एक गोळी ह्रदयात गेली. या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळी 42 वर्षीय हल्लेखोर यामागामी तेत्सुयाला अटक केली. तो माजी सैनिक असल्याचे सांगण्यात येत आहे.
67 वर्षीय आबे सुरक्षा दलासंदर्भात भाषण देत होते. त्याचवेळी प्रेक्षकांमधून एक जण आला आणि त्याने कॅमेऱ्यासारख्या असलेल्या बंदुकीतून गोळी चालवली. जपानचे सरकारी टीव्ही NHK कडून केलेल्या ब्रॉडकास्टमध्ये हे फुटेज दिसत आहे. जेव्हा गोळीबाराचा जोरदार आवाज आणि ओरडण्याचा आवाज येतो.