काँग्रेसला आज अध्यक्षपदाचा नवा चेहरा मिळणार आहे. 17 ऑक्टोबर म्हणजे सोमवारी अध्यक्षपदाची निवडणूक झाली. आणि निवडणुकीत 96 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. अंदाजे 9500 सदस्यांनी मतदान केलंय. तब्बल 22 वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीत मल्लिकार्जून खरगे आणि शशी थरूर यांच्यात अटीतटीची लढाई होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण होणार नवे अध्यक्ष, नव्या अध्यक्षासमोर कोणकोणती आव्हाने असतील. असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत. खरगे यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पाठिंबा होता. मात्र, शशी थरूर यांनीही राज्याराज्यांत प्रचार करून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न केला. दोन दशकानंतर पहिल्यांदाच काँग्रेसला गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष मिळणार आहे.